महाराष्ट्र


Unit:
Vistar Kendra:
Contact Place:
College Units:
Membership:
State Executive:
Council:


बातम्या

  • अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी अभाविपचे विद्यापीठात आंदोलन:
  • मुंबई - अभियांत्रिकी शाखेच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. ८) मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस येथे आंदोलन केले.
    दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १७ सप्टेंबरपासून घेण्याबाबतचे पत्र विद्यापीठाने परीक्षा नियंत्रक प्रा. विलास शिंदे यांना पाठविल्याचे अभाविपच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले असले, तरी विद्यापीठाने मात्र कालच या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केल्याचे म्हटले आहे.
    मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन सेमिस्टरनंतर नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षाअर्ज भरावा लागतो. परंतु हा नियम विद्यापीठाने महाविद्यालयांना कळविला नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज जुन्याच अभ्यासक्रमानुसार फेब्रुवारी २००९ मध्ये भरून घेण्यात आले. अर्ज भरून घेताना विद्यापीठाने कोणताही आक्षेप घेतला नाही. मे महिन्यात होणाऱ्या परीक्षादेखील विद्यापीठाने घेतल्या नाहीत. ही चूक विद्यापीठाची असून अभियांत्रिकी शाखेच्या या विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्वरित घेऊन लवकरात लवकर निकाल जाहीर करावा आणि उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरला बसण्याची परवानगी द्यावी, तसेच या विद्यार्थ्यांना प्रॅक्‍टिकल व लेक्‍चर्सना बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी "अभाविप'ने विद्यापीठाकडे केली आहे. असे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

  • प्रा. सभरवाल हत्या प्रकरणातून अभाविपचे सहा कार्यकर्ते निर्दोष:Tuesday, July 14th, 2009 AT 12:07 AM
  • नागपूर - उज्जैन येथील माधव महाविद्यालयातील प्रा. हरभजन सभरवाल यांच्या हत्येप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सहा कार्यकर्त्यांची येथील विशेष न्यायालयातील अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन दळवी यांनी निर्दोष सुटका केली. सरकारी पक्ष प्रा. सभरवाल यांची हत्या करण्यात आल्याचा कोणताही सबळ पुरावा सिद्ध करू शकले नाहीत, असे निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.

  • नवे सर्व स्वीकारा; पण मुळाशी पक्के राहा-Tuesday, July 07th, 2009 AT 11:07 PM
  • नवे सर्व स्वीकारा; पण आपल्या मुळाशी पक्के राहा, या भूमिकेशी ठाम राहून संघटना वाढविण्याचे आव्हान विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारायला हवे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले



Programmes:


Agitations:

Link to abvp state site


Maharashtra Event Photos
See Photo Gallery Click